गोकाक:”कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असल्यामुळे सरकारला सहकार्य केलेच पाहिजे तरच राज्यात विषाणूंचा प्रादुर्भाव रोखता येईल,” असे प्रतिपादन युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी केले.ते महाविद्यालयाच्या सभागृहात सतीश शुगर्स अॅकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या कोविड लसीकरण मोहिमेप्रसंगी बोलत होते .
यावेळी त्यांनी कोविड-19 लस मोहिमेसंदर्भात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्याशी संवाद साधला.आणि आपले मनोगत व्यक्त केले.
सरकारने विद्यार्थ्यांना कोविड लस मोफत देण्याची व्यवस्था केली आहे. कोविड-19 पासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी मुलांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करावे असे यावेळी सांगितले .
कोविड विषाणू गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांना त्रास देत आहेत. यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुलांना लसीकरण करणे आवश्यक आहे. लस दिल्यानंतरही फेस मास्क, शारीरिक अंतर आणि वारंवार हात धुणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले
यावेळी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी राहुल जारकीहोळळी यांचा सत्कार केला.याप्रसंगी डॉ. रवींद्र अँटिना, आर.एस.दुम्मागोला, एस.एस.मेंसागी, टी.बी.थलवारा, आर.जी.बस्सापुरा, मारुती गुटागुड्डी, विवेक जट्टी, आरोग्य विभागाचे डॉक्टर, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.