आमच्या कामाचा मोबदला द्या –
रोजगार हमीतून महिलांच्या हाती चार पैसे येतात यातून च्या आपला घरदार संसार सांभाळतात मात्र याच महिलांना पगार वेळेवर देण्यात न आल्यचा आरोप रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी केला आहे. यावेळी त्यांनी रास्ता रोको करून आपल्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी केली आहे.
रोजगार हमी योजनेतील महिलांनी मण्णूर गोजगा रस्त्यावर आज रास्ता रोको केला. तसेच रोहयो योजनेतील अधिकाऱ्यांची बदली करा अशी मागणी यावेळी केली.
आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील आणि ग्रामपंचायत च्या नेतृत्वाखाली रोहयो योजना अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी या वेळेत रास्ता रोको केला. रोहयोंतर्गत शंभर किंवा दीडशे दिवस काम केले जाते.मात्र सदस्यांकडून ते काम करून देखील त्यांना व्यवस्थित पगार देत नसल्याचा आरोप यावेळी उपस्थित महिलांनी केला.
तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या महिलांना पगार योग्य वेळेत उपलब्ध करून द्यावा. आणि याअंतर्गत बेकायदेशीर काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी यावेळी केली.