बेळगाव :
नवीन वर्षाच्या निमित्ताने वर्षाच्या सुरुवातीलाच आमदार अनिल बेनके यांनी शहरातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी ते म्हणाले आगामी काळात बेळगावातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधे संबंधी कोणतीही तक्रार उद्भवू नये तसेच नागरी सुविधांचा बाबत अधिकाऱ्यांनी आवश्यक ती सोय करावी याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
बेळगावात पाण्याची समस्या अनेक वेळा डोके वर काढते त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवू नये, ज्या ठिकाणी पाण्याची समस्या उद्भवली आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तेथील काम लवकर पूर्ण करावे तसेच कोणत्याही भागात गळती लागली असल्यास त्याचे तातडीने निवारण करावे. याचबरोबर कोणत्या भागात पाण्याची समस्या असेल तर त्या भागात टँकरची सोय उपलब्ध करून द्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.
या बैठकीला स्मार्ट सिटी चे वरिष्ठ अधिकारी महापालिका आयुक्त कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम खाते आणि अन्य विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते