एकाच दोरने जोडप्याची आत्महत्या
एकाच दोरीने गळफास घेऊन पती पत्नी ने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दाम्पत्यांनी शेतातील झाडाला एकाच दोरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या जोडप्याने आत्महत्या का केली असावी याबाबत पोलीस शोध घेत असून सदर घटना महाराष्ट्रातील सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारात घडली आहे.
रामदास इंगळे वय 24 आणि शितल इंगळे वय 22 असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.3 वर्षापूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता.लग्नाच्या काही दिवसानंतर ते दाताडा शिवारातील शेतात राहत होते.
दरम्यान तीन महिन्यापुर्वी शितल इंगळे या माहेरी मडी या गावी गेल्या होत्या. त्यामुळे शेतातील घरी रामदास इंगळे व त्यांची आई सरस्वतीबाई इंगळे हे दोघेच राहात होते. दोन दिवसापुर्वी रामदास देखील मडी येथे गेले होते. त्यानंतर ते शेतावर आलेच नाहीत.त्यानंतर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास काही शेतकरी दाताडा बुद्रुक शिवारातून जात असतांना एका झाडाला दोन मृतदेह लटकल्याचे दिसून आले. त्यांनी हा प्रकार गावात कळविल्यानंतर गावकरी घटनास्थळी आले. तसेच सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत .