नुकत्याच झालेल्या एमएलसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला असल्याचे केपीसीसीचे अध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
ते एका आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते .यावेळी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला .
यावेळी ते म्हणाले अथणी नगरपालिकेत १५ वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा फडकत आहे. राज्यात भाजपचे सरकार असूनही काँग्रेसची मात्र ओवाळणी सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्ष संघटित केला पाहिजे. असे ते म्हणाले
यावेळी अथणी नगरपालिकेच्या निवडणुकीत 18 वर्षांनंतर काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे काँग्रेस नेते गजान मंगुसी यांनी सांगितले.सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अधिक संघटित होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .याप्रसंगी आमदार उपस्थित होते.