पहिली कॉपी फ्री असताना 40 रुपये आकारणी
जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देताना कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची अरेरावीची भाषा वापरत असल्याचे पाहायला मिळत आहे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर हे काही कामानिमित्त महापालिकेमधील आरोग्य विभागकडे गेले असता दाखल्यासंदर्भात याठिकाणी अरेरावी करण्यात आली
सायबर साईट बरोबर साटेलोटे करून तेथूनच मृत्यु जन्म प्रत भेटते असे त्यांना सांगितले . यावेळी एका प्रिंटसाठी चाळीस रुपयाची आकारणी केली जात असल्याचे यावेळी पाहायला मिळाले . जिथे सरकारी संदेश येतो की पहिली कॉपी फ्री आहे तर मग 40 रुपये आकारणी कशासाठी अशी विचारणा त्यांनी केली .
तर यावेळी त्यांनी मनपा मध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना काही विचारणा केल्यास HO जाऊन विचारा असे उद्धट उत्तर दिल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना जाब कोण विचाराणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर उपस्थित करत आहेत