जीनाप्पा वस्ताद तालीम मधील मारुती मूर्तीचा वर्धापन दिन साजरा
बेळगाव :लोहार गल्ली अनगोळ येथील जीनाप्पा वस्ताद तालीम मध्ये मारुती मूर्ती स्थापना करून तीन वर्षे पूर्ण झाल्याने आज तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सकाळी मूर्तीला अभिषेक करून पूजेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विधीवत पूजा आणि धार्मिक विधी करण्यात आला. तसेच भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
आजकालची युवा पिढी पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करुन व्यसनाधीन होत आहे. तसेच जिम मध्ये देण्यात येणारे प्रोटीन पदार्थांचे सेवन करत असून लवकर तंदुरुस्त होण्याकरिता प्रयत्न करत आहे. मात्र या पदार्थांच्या सेवनाने शरीराचे नुकसान होत आहे.
अशा या पदार्थांच्या सेवनाने युवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सर्व युवकांनी तंदुरुस्त करण्याकरिता कोणत्याही पदार्थाचे सेवन न करता त्यांनी हिंदू पद्धतीनुसार तालीम मध्ये येऊन व्यायाम करणे गरजेचे असल्याचे मत वर्धापन दिनानिमित्त व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी तालीम मधील सदस्य आणि अनगोळ परिसरातील युवक उपस्थित होते.