कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दत्ता पाटील विजयी
बेळगाव : या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये
कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दत्ता पाटील आणि कल्लापा अष्टेकर विजयी झाले आहेत. कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी मध्ये वॉर्ड क्रमांक 10 मधून दत्ता पाटील यांना 359 मते मिळाली आहेत. तर वार्ड क्रमांक 13 मधून कल्लाप्पा अष्टेकर यांना 501 मते मिळाली असून ते दोघेही विजयी झाले आहेत.
दत्ता पाटील हे तिसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याने त्यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली. तसेच कंग्राळी बुद्रुक मध्ये फटाक्यांची आतषबाजी करून ग्रामस्थांनी यावेळी विजयोत्सव साजरा केला.