मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जॉब प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी SASMOS एरोनॉटिकल बहुराष्ट्रीय कंपनी बेंगलोर द्वारे या जॉब प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा मंडळ पॉलीटेक्निक कॉलेजमधील अंतिम वर्षाच्या 22 विद्यार्थ्यांची यांमध्ये निवड झाली आहे.
यामध्ये इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या विभागातील विद्यार्थ्यांना एरोनॉटिकल कंपनीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे त्यामुळे मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, प्राचार्य आर ए सूर्यवंशी एचडी यांच्या वतीने सर्व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आणि तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.