31 डिसेंबरच्या रात्री युवावर्गाकडून मद्यपान, धूम्रपान अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार वाढले आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत हिंदू धर्मातील युवक युवतींकडून गैर प्रकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या सर्वाला आळा बसावा याकरिता हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मद्यधुंद अवस्थेतील युवकांकडून 31 डिसेंबरच्या रात्री आणि काही प्रकार करण्यात येत आहेत. तसेच रात्री-अपरात्री गोंगाट गाणी लावून हिडीस नृत्य करण्यात येत आहे. त्यामुळे हा सर्व गैरप्रकार थांबावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
युवकांकडून मद्यप्राशन करण्याबरोबरच युवतींना छेडण्याचे प्रकार देखील वाढले आहेत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. येणाऱ्या पिढीसमोर चांगला आदर्श निर्माण व्हावा याकरिता नववर्षाच्या स्वागताचा खाली करण्यात येणारे गैरप्रकार थांबविण्याची मागणी होत आहे
यावेळी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबत निवेदन देण्यात आले याप्रसंगी सुधीर हेरेकर व्यंकटेश शिंदे बाळू कुरबर सदानंद मासेकर विनोद पाटील नागेंद्र अष्टेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.