बलिष्ठ राष्ट्रनिर्मितीसाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी सक्षम पणे भूमिका बजावली. तसेच त्यांनी त्यांच्या प्रेरणेने कारगिल युद्धात देशाच्या सैनिकांना शौर्य दाखवत देशाची सक्षमता दाखवून दिली अशीच अनेक कार्ये त्यांनी केली ती अविस्मरणीय आहेत असे प्रतिपादन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी किरण जाधव यांनी केले.
ते विमल फाऊंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेचा संपर्क कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना अभिवादन करताना बोलत होते. यावेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाला दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी चैतन्य नंदगडकर, शिवकुमार मालकनवर,महेश साळुंखे,अक्षय साळवी सोनल सपकाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.