नवं वर्षाच्या स्वागताचा प्लॅन करताय ?मग थांबा !ही आहे नियमावली
बेळगाव :राज्यात वाढत असलेल्या संसर्गाचा विषय लक्षात घेऊन येत्या 30 डिसेंबर पासून 2 जानेवारी 2022 पर्यंत राज्य सरकारने अनेक सामुहिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे.
देशातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर सर्वत्र खबरदारीचा उपाय योजना राबविण्यात आल्या. सध्या कर्नाटकात ओमिक्रॉन व्हेरीएंटचे 19 रुग्ण आढळले असून या रुग्ण संख्येत आणखीन वाढ होऊ नये याकरिता राज्य सरकारने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नियमावली काढली आहे. यात सामूहिक कार्यक्रमांवर बंदी आणल्याने अनेकांना नववर्षाचे स्वागत जल्लोषात करता येणार नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
यामध्ये सरकारने निवासी संकुल अर्थात अपार्टमेंटमध्ये नववर्ष स्वागताला परवानगी दिली आहे मात्र त्याठिकाणी कोरोना नियमांचे पालन सक्तीचे केले आहेत.तसेच डीजे सारख्या आयोजनावर बंदी घातली आहे.
तसेच रस्ते उद्याने मैदान आदी सामूहिकपणे नववर्ष कार्यक्रम करण्यावर बंदी आणली असली तरी रेस्टॉरंट हॉटेल क्लब यासारख्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करणे बंधनकारक केले आहे. तसेच या ठिकाणी कोरोना लसीकरणाची प्रतिबंधात्मक डोस घेतलेल्याच प्रवेश देण्यात यावा अशी सूचना केली आहे.
तसेच कोणत्याही खाजगी जागेत अथवा क्लब पब रेस्टॉरंट हॉटेल मध्ये डीजे ऑर्केस्ट्रा सामूहिक नृत्य यासारख्या आणि कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.त्यामुळे यंदा नवं वर्षाचे स्वागत फक्त फोन वर बोलून आणि
मेसेज पाठून करता येणार आहे .