कोरोना मयतांच्या कुटुंबियांना मिळाली नुकसान भरपाई
कोविड-19 मुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली .कोरोनामुळे अनेक कुटुंबीयांना आपल्या घरातील सदस्यांना गमविण्याची वेळ आली आहे .त्यामुळे अश्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याकरीता राज्य सरकारने कोरोना मयतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देऊ केली आहे .आज आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते सर्व कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात आली .
आवाहन
ज्या मयतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज भरावे असे आवाहन करण्यात आले आहे .तसेच कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीची कोणतीही वयोमर्यादा नाही .कोरोना मयतांच्या सर्व कुटुंबियांना एक लाखा पर्यंत नुकसान भरपाई दिली जात आहे अशी माहिती देण्यात आली आहे .