महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली,
भेटीत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती च्या शिष्टमंडळाने सीमाभागात बेळगाव येथे होत असलेल्या दडपशाहीचा पाढा वाचला .
बेंगळूर येथील शिवमूर्ती विटंबनेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात जमलेल्या शिवभक्ताना अटक करून त्यांच्यावर गंभीर हुंहे दाखल करण्यात आले आहेत, कानडी संघटनांच्या दबावाखाली येऊन मराठी युवकांचे भविष्य अंधारमय करण्याचा हेतूने त्यांच्यावर बेळगावच्या विविध पोलीस ठाण्यात खोट्या केसेस घालण्यात आलेल्या आहेत, याची माहिती श्री देवेंद्र फडणवीस यांना दिली गेली .
श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि मराठी बांधवांवरील खोट्या केसेस प्रकरणी आजच कर्नाटक चे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून चर्चा करून बेळगावच्या मराठी बांधवांवर होत असलेली दडपशाही आणि अटकसत्र थांबविले जावे अशी मागणी करणार आहे,
तसेच बेळगाव सह सीमाप्रश्नी आम्ही महाराष्ट्र मधले सगळे पक्ष गंभीर आहोत आणि सर्वपक्षीय एकजुटीने आम्ही सीमाबांधवा च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू याची ग्वाही दिली तसेच वेळ पडल्यास मी बेळगाव ला येऊन सीमाबांधवांची भेट नक्कीच घेईन, तसेच सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान आणि गृहमंत्री याना भेटण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती च्या शिष्टमंडळा ला दिली.
यावेळी चंदगड विभागाचे भाजप नेते श्री शिवाजी पाटील आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.