बीम्सच्या लॅबचे उदघाटन आरोग्यमंत्रांच्या हस्त
जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या जिनोम सिक्वेसिंग लॅबचे उद्घाटन काल आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, नवीनराज सिंग ,आमदार अनिल बेनके प्रादेशिक आयुक्त अमलान विश्वास ,जिल्हाधिकारी आर वेंकटेश, यांच्यासह वैद्यकीय संचालक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ के सुधाकर यांनी ओ मिक्रोन या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्या सरकारी रुग्णालयात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे याबाबत बीम्स प्रशासनाला सूचना केल्या.