निराधार व्यक्तीला दिला आधार
बेळगाव :निराधार व्यक्तीला आधार देण्याचे कार्य सेवा फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले. येथील नागेश कित्तूर यांनी दिलेल्या माहितीनुसार सेवा फाउंडेशन च्या सदस्यांनी एका बेघर आणि निराधार व्यक्तीला मदत देऊ केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की गोवावेस कॉम्प्लेक्समध्ये एक व्यक्ती निद्रावस्थेत होता यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाल्याने सूज आली होती त्यामुळे त्याला चालणे देखील अशक्य बनले होते.यावेळी नागेश कित्तूर यांनी ही बाब सेवा फाउंडेशन च्या सदस्यांना कळविली
यावेळी लागलीच सेवा फाउंडेशन चे सदस्य द हिंद सोसायटीची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले यावेळी त्यांनी त्या व्यक्तीला उपचाराकरिता बीम्स मध्ये दाखल केले.
यावेळी बीम्स येथील डॉक्टरांनी त्या व्यक्तीवर उपचार केले यावेळी त्यांच्या लक्षात आले की सदर व्यक्तीच्या पायाचे हाड तुटल्यामुळे त्याला चालता येत नाही त्यामुळे त्यांनी प्लास्टर घालून त्या व्यक्तीस विश्रांती घेण्यास सांगितले. त्यानंतर सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी सदर रुग्णाची राहण्याची सोय खासबाग येथील शासकीय निवारा गृहात केली.
निराधार व्यक्तीला आधार दिल्याने नागेश यांनी सेवा फाउंडेशन च्या टीमचे आभार मानले. तसेच निराधार व्यक्तींनी ही सेवा फाऊंडेशनने केलेल्या मदतीच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.