अर्धवट असलेल्या नूतन बसस्थानकाची पाहणी मंत्र्यांनीच करावी :अनिल बेनके
बेळगाव :गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला दोन वर्षाची मुदत वाढवून दिल्याचे उपमुख्यमंत्री कारजोळ यांनी सांगितले. ते हिवाळी अधिवेशनात राज्य विधिमंडळाच्या बैठकीत आमदार अनिल बेनके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
आमदार अनिल बेनके यांनी मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला विलंब होत असल्याने अधिवेशनात आवाज उठविला.त्याप्रसंगी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री करजोळ बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की 2017 साली बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र बेळगाव मध्ये पडणाऱ्या महापुरामुळे आणि कोरोनामुळे कामगार गावी गेल्यामुळे कामाला विलंब झाला असल्याचे यावेळी त्यांनी आमदार अनिल बेनके यांना सांगितले. सदर काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी बेनकेना दिला.
यावेळी बेनके यांनी 2018साली दिलेली वर्कऑर्डर 2019 पर्यंत पूर्ण झाली नाही.तसेच आता 2021 पर्यंत व स्थानकाचे काम अर्धे देखील पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त केली त्.यामुळे आता खुद्द मंत्र्यांनी बेळगाव मध्ये असताना या बस स्थानकाच्या कामाची पाहणी करावी अशी विनंती त्यांनी सभागृहात केली.