गृहभाग्य योजनेअंतर्गत या ठिकाणी उभारण्यात येणार निवासी संकुल
बेळगाव :येथील आजमनगर मध्ये गृहभाग्य योजनेअंतर्गत पौरकर्मीकांना 12 कोटी 8 लाख रुपये खर्चून निवासी संकुल उभारण्यात येणार आहे.
या निवासी संकुलात एकूण 120 घरांचे बांधकाम करण्यात येणार असून महानगरपालिकेच्या हद्दीत हे काम करण्यात येणार आहे.
त्यामुळे या कामाचा शुभारंभ आज भैरती बसवराज यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सदर जागेचे भूमिपूजन नगर विकास मंत्री भैरती बसवराज यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी,उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर,नगरसेवक रेश्मा पाटील, जयतीर्थ सौंदत्ती, इम्रान फत्तेखान यांच्यासह आणि नागरिक उपस्थित होते.