बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे..तसेच परप्रांतीय कामगारांनी अतिक्रमण केल्यामुळे स्थानिक युवकांच्या पोटावर पाय आले आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी भाजप ग्रामीण जिल्ह्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी कामगार खात्याचे मंत्री शिवराम हेब्बार यांना निवेदन दिले आहे.
स्थानिक युवकांचा रोजगार बुडाला आहे. तसेच युवकांना परगावी जाऊन आपली भूक भागवावी लागत आहे. त्यातच अनेकांना कामावरून काढून टाकण्यात आल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ही समस्या गंभीर असून बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी कामगार खात्याच्या मंत्र्यांकडे केली आहे.
यावेळी सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कामगार खात्याचे मंत्री शिवराम हेब्बार यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले . तसेच स्थानिक रोजगार किती महत्वाचा आहे हे पटवून दिले.
यावेळी हेब्बार यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी पंडित विजय शर्मा, प्रिया पुराणिक, डॉ संजय कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी कामगार मंत्र्यांना भारत मातेची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यावेळी त्यांनी या सर्वांचे आभार मानले.