अशोक पुजारी यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश
2023 च्या निवडणुकीत गोकाक मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकू द्या असे आवाहन केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी काँग्रेस भवन मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
यावेळी ते म्हणाले की अशोक पुजारी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून येणाऱ्या निवडणुकीत ते काँग्रेस पक्षातून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे त्यांना गोकाक मतदार संघातून निवडून आणून द्यावे तसेच गोकाक भागात काँग्रेस पक्ष मजबूत होण्याकरिता सर्वांनी हातभार लाववे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अशोक पुजारी यांनी तीन वेळा पराभव पत्करला आहे.मात्र जनतेच्या कामासाठी ते नेहमी पुढे आले आहेत. गोकाक विधानसभा निवडणुकीत तीन वेळा जेडीएस मधून तर एकदा भाजप मधून उमेदवारी लढताना त्यांनी पराभव पत्करला आहे. मात्र आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा गोकाक मतदार संघात विजयी करुन देण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला आहे.
अशोक पुजारी हे संघर्षाच्या मार्गावर चालणारे आहेत त्यामुळे मतदारसंघात भव्य सभा घेऊन त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम पणे उभे राहणार असल्याचा विश्वास केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले. काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.प