कारवार जिल्ह्यातील तिघांचा अपघातात जागीच मृत्यू
कारवार जिल्ह्यातील रहिवाशांचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारवार जिल्ह्यातील यल्लापुर चे रहिवासी जागीच ठार झाले आहेत.वसीम खान वय 40 सय्यद इस्माईल दाऊत वय 65 आणि सुशीला फर्नांडिस वय 60 अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
हिरेबागेवाडी नजीक वीरणकोप येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज सकाळी भरधाव कारने लॉरी ला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवरउपचार सुरू असून या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.धारवाड कडुन भरधाव वेगाने बेळगावच्या दिशेने येणाऱ्या कारने राष्ट्रीय महामार्ग 4 क्रमांक वर विरणकोप क्रॉस येथे समोर चाललेल्या लॉरी ला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.