वीरेश हिरेमठ यांचे कार्य कौतुकास्पद
बेळगाव : सर्व लोक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ समाजाला हातभार लावण्यासाठी झटत आहेत. फूल ना फुलाची पाकळी समजून आपल्या हातून छोटे कार्य घडत रहावे यासाठी ते झटत आहेत.
रुग्णसेवा करण्याबरोबरच दर रविवारी ते भग्न देवतांच्या प्रतिमांचे संकलन करतात. तसेच मृत झालेल्या मुक्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य देखील ते करतात. खानापूर रोड वरून ते जात असताना त्यांना वाटेत एक श्वान मृतावस्थेतपडलेला निदर्शनास आला.
यावेळी त्यांनी लागलीच गाडी थांबवून रस्त्यामध्ये पडलेल्या मृत श्वानाला बाजूला केले. तसेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करून आपल्या पुढील प्रवासास निघाले.
वाहन धारकांच्या चुकीमुळे मुक्या प्राण्यांचा प्राण जात आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष पूर्वक आपल्या मार्गाने जावे तसेच रस्त्यामध्ये एखादे जनावर आडवे आल्यास आपल्या गाडीचा वेग कमी करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.