कडोली येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 27 लाख रुपये मंजूर
बेळगाव: आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या मतदार क्षेत्रात विविध विकास कामे राबवत आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ नये याकरिता तसेच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता ते आपल्या भागात विविध विकास कामे राबवत आहेत. येथील कडोली गावातील प्रभू गल्लीत त्यांनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजूर केला आहे.
आमदार सतीश जारकीहोळी यांनी 27 लाख रुपये मंजूर करून येथील रस्त्याच्या कामाला चालना दिली आहे.आज म्हणजे सोमवार दिनांक 20 डिसेंबर रोजी येथील रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात पार करण्यात आला.
यावेळी केपीसी सदस्य मलगोंडा पाटील ,माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण कांबळे ,ग्रामपंचायत अध्यक्ष नरोटी ,राजू मायानाचे, वैजू मुटकुळे ,गौरव पाटील ,बाबू बडीगेर, कल्लाप्पा नरोटे ,पीकेपीएस अध्यक्ष प्रकाश राजई, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.