बाहेरील समाजकंटकांमुळेच बेळगावात तणावपूर्ण वातावरण
उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि नगरसेवक यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवमुर्तीला अभिषेक करण्यात आला.तसेच पुष्पहार अर्पण करून त्यांची पूजा करण्यात आली. त्यांनतर आमदारांनी जिल्हा आवारातील क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शहरात उद्या सकाळपर्यंत 144 कलम लागू असल्याने प्रशासनाच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता दोन्ही ठिकाणी भेट दिली
बेंगलोर मध्ये झालेल्या महाराजांच्या मुर्तीच्या विटंबनेचे पडसाद बेळगावात उमटले. त्यानंतर संतप्त झालेल्या बेळगावकरांनी धर्मवीर संभाजी चौक येथे मोर्चा काढला. यावेळी याच संधीचा फायदा घेत बेळगाव बाहेरील समाजकंटकांनी संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्याची विटंबना केली असे आमदार अनिल बेनके यांनी बोलताना प्रसारमाध्यमांला सांगितले.
तसेच यापुढे बेळगावात अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता आपण सर्वांनी एकत्र मिळून मिसळून राहू असे सांगितले. बाहेरील समाजकंटकांकडून अशा प्रकारची गैरकृते करण्यात येत आहेत. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा कोणताही समावेश नाही असे स्पष्ट केले. तसेच यापुढेही बीजेपीचे कार्यक्रते अशा कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करणार नसल्याचा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.