त्या घटनेचा ट्विटर द्वारे जाहीर निषेध
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी लिहिलं आहे की,
संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमठत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी.
तर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी tweet करत संतप्त भावना व्यक्त केली आहे ते लिहितात की,
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.