*बेळगाव ओशो मिडिटेशन सेंटर येथे दर रविवारी मोफत ध्यानसाधना व प्रवचन*
*कर्नाटकातील या नामवंत केंद्राचा उपक्रम
बेळगाव (रवी पाटील) : बेळगाव येथे ओशो मिडिटेशन सेंटरच्या वतीने दर रविवारी दु .२ ते ५ यावेळेत मोफत ध्यानसाधाना व प्रवचन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती साधक साधना सपारे यांनी दिली.
बेळगाव नानावाडी येथील आश्रय कॉलनी येथे नुकताच ओशो मेडिटेशन सेंटरचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता.
बेळगाव येथील हे पहिलेच मिडिटेशन सेंटर साधक साधना सपारे यांनी सुरु केले आहे.
ओशोचे आठ हजार प्रवचने आहेत. ते उपनिषद ,महावीर वाणी , गौतम बुद्ध , कृष्णदर्शन , अष्टावक्र महागीता , शिवसूत्र , मिरा , नारदसुत्र , गोरख व पतंजली योगसूत्र यावर प्रवचने दिली आहेत.
ओशोनी संत कबीर , गुरुनानक , लाओत्से , जिजस व महमंद पैंगबर यांचे तत्वज्ञान व आध्यात्म बद्दल बोलले आहेत म्हणजे सर्वामध्ये प्रेम वसले पाहिजे अशी
असहिविष्णूता ही शिकवण ओशोनी दिली .
रोजच्या धकाधकीच्या जीवनातील स्वतःचा ताण तणाव कमी करण्यासाठी ध्यान साधना महत्वाची आहे. ओशोनी 115 ध्यानविधी साधकांसाठी दिले आहेत यापैकी मुख्य ध्यान नादब्रह्म ध्यान, कुंडलिनी ध्यान, विपश्यना ध्यान, चक्रासाऊंड ध्यान , सक्रिय ध्यान ,मौनध्यान , नटराज ध्यान व किर्तन ध्यान असे हे मुख्य ध्यानविधी येथे घेतले जातात.
ध्यान म्हणजे एकरूप होणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो. ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते. ध्यान केल्याने सुख, दुःखाच्या पलीकडील अनुभूवती होते. ध्यानाने कमवलेली ऊर्जा चौविस तास टिकविण्याचे काम करते. जीवनाला आनंद देते. स्थिर होण्याची कला शिकवते. आपलं स्वास्थ उत्तम होण्यासाठी तसेच मनशांती ही लाभते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. असे ध्यान केंद्राच्या प्रमुख साधक साधना सपारे यांनी सांगितले.
*दर रविवारी मोफत ध्यानसाधनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी*
या केंद्रात दररोज मोजक्या साधकांना ध्यान करण्याची संधी ही उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी नि:शुल्क ध्यान साधना करण्यासाठी संपर्क साधावा- *प्रेमसाधना – 9964332199*