त्या घटनेचा बिंदू चौकात निषेध
कोल्हापूर: बेळगावात महामेळावा दरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर जो शाई हल्ला झाला त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळत आहे. येथील कोल्हापूर मधील बिंदू चौकात बेळगाव मध्ये झालेल्या घटनेचा शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच कानडी गुंडांचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
बेळगावात मराठी माणसांची गळचेपी करण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र सीमा बांधवांनी घाबरून न जाता त्याला सामोरे गेले पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र सीमा बांधवांच्या पाठीशी आहे असे वक्तव्य जिल्हाप्रमुख संजय पवार त्यांनी यावेळी बिंदू चौकात केले.
तसेच कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी ज्याप्रकारे दीपक दळवी वर हल्ला केला. त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे सुजित चव्हाण विनोद खोत अवधूत साळुंखे बबलू शेख गीतांजली गायकवाड कमलाताई पाटील दिलीप देसाई सुशांत देसाई यांच्यासह शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते