श्री साई भैरवनाथ 3 गाव मर्यादित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
बेळगाव: गौंडवाड यमनापुर आणि बीके कंग्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई भैरवनाथ तीन गाव मर्यादित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी महात्मा गांधी हायस्कूल मैदानावर पार पडली.
यावेळी कंग्राळी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने दीपप्रज्वलन करण्यात आले. तर श्रीराम हिंदुस्तान अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यलोजी पाटील यांच्या हस्ते यष्टी ला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते नाणेफेक करुन क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत विजेत्या झालेल्या संघाला आकर्षक बक्षीस रोख रक्कम आणि पारितोषिक वितरित करण्यात आले. प्रथम पारितोषिक वीस हजार रुपये श्री इम्रान सय्यद यांच्या हस्ते देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक श्री साई भैरवनाथ स्पोर्ट्स गौंडवाड यांच्यावतीने प्रतीक पिंगट यांच्या वतीने देण्यात आले तर तृतीय पारितोषिक हर्ष पाटील यांच्या वतीने देण्यात आले.