भाजपवाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरून राजकारण करतात असे उदगार कर्नाटक प्रदेश काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष एफ.एच. जक्कप्पनवर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काढले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने काँग्रेसने दिल्लीत आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले होते.भाजप वाले येथे स्वतचे कार्यालय थाटून बसलेत.या बाबत भाजपने खुलासा करून वस्तुस्थिती सांगावी असे आवाहन देखील जक्कप्पनवर यांनी केले. सिध्दरामय्या यांचे सरकार असताना एकतीस हजार कोटी रु मागासवर्गीय जाती जमातीच्या कल्याणासाठी राखून ठेवण्यात आले होते.यामुळे मागासवर्गीय मुलांची वसती शाळा,उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत होती.व्यवसाय करणाऱ्यासाठी दहा कोटी रु राखून ठेवण्यात आले होते.निरुद्योगी तरुणांना पाच लाख सबसिडी व्यवसायासाठी देण्यात येत होती.याचा लाभ हजारो जणांनी घेतला.पण भाजप सरकार सत्तेवर आल्यावर सिध्द रामय्या यांच्या सगळ्या योजना थांबवण्यात आल्या आहेत.कायद्याने देण्यात येणारे अनुदान देखील मिळत नाही.अनुसूचित जाती जमाती साठी प्रतेक आर्थिक वर्षात पंचवीस टक्के राखीव रक्कम ठेवली पाहिजे.मागासवर्गीय जाती जमातीसाठी असणारा कायदा सात डी रद्द करावा अशी मागणी देखील पत्रकार परिषदेत जक्कप्पनवर यांनी केली.