दीपक दळवी यांचा दुग्धाभिषेक
बेळगाव : नव कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकता संपत देसाई यांने व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रवेश करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई हल्ला केला. त्याचे पडसाद उमटल्यावर आणि सर्व परिस्थिती शांत झाल्यावर समिती कार्यकर्त्यांचा वतीने दीपक दळवी यांना दुग्धाभिषेक केला.
दीपक दळवी यांच्यावर शाई फेकून भ्याड हल्ला केल्याने या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचा भडका उडाला. तसेच यावेळी या घटनेच्या निषेधार्थ उद्या सीमाभाग बंदची हाक पुकारण्यात आली. यावेळी व्हॅक्सिन डेपो परिसरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला .
त्यानंतर समिती कार्यकर्त्यांनी टिळकवाडी पोलीस स्टेशन वर मोर्चा काढून तक्रार नोंदविली. यावेळी पोलिस स्टेशन समोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर त्यांनी दीपक दळवी यांना दुग्धाभिषेक करून जलाभिषेक केला.