आमदारांचे हे राजकीय षड्यंत्रच
बेळगाव :डॉ अंजलीताई निंबाळकर यांना खानापूर तालुक्यातील विकासाची आठवण झाली असल्याने त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसौद पर्यत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आपले अपयश लपविण्याचा करिता त्यांनी असा निर्णय घेतला असल्याचा आरोप बेळगाव ग्रामीण महिला मोर्चाचे उपाध्यक्षा सोनाली सरनोबत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडविण्याकडे आमदारांचे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आपले अपयश लपविण्यासाठी करिता ते सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करत आहेत. खानापूर भागात विकास न झाल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
मात्र लोकांना आपल्या पाठीशी घेऊन त्या विधानसौध वर पदयात्रा काढणार असल्याने हे कोणते राजकीय षडयंत्र आहे असा प्रश्न सोनाली सरनोबत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.