महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत आज शनिवार रोजी होसुर बसवणगल्ली परिसरातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत ज्यांचे वाढदिवस, किंवा दिनविशेष असतात अश्या व्यक्ती शैक्षणिक साहित्य देणगी स्वरूपात युवा समीतीकडे सुपूर्द करतात त्या साहित्याचे वितरण युवा समितीच्या वतीने प्रतिवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणारे विध्यार्थी आणि गरजू होतकरू विद्यार्थी याना करण्यात येते,
या कार्यक्रमाला युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, प्रशांत भातकांडे, महेश लाड,सरचिटणीस श्रीकांत कदम, दक्षिण प्रमुख प्रवीण रेडेकर, संघटक राजू कदम, सुरज चव्हाण,आकाश भेकणे इतर पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.