बेळगाव बार असोसिएशने वाहिली श्रद्धांजली
बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि भारतीय शास्त्र दलातील 12 अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. येथील न्यायालय आवारातील ओल्ड बार असोसिएशन टीव्ही हॉलमध्ये सर्व बार असोसिएशनच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत बेळगाव बार असोसिएशनचे सदस्य कै आर जे रोहिले आणि
बुक्कापट्टणम वेंकटाचार्युलू यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश, सी.एम. जोशी यांनी अत्यंत दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात भारताचे संरक्षण कर्मचारी, दिवंगत जनरल बिपिन लक्ष्मण सिंग रावत, त्यांची पत्नी आणि अन्य १२ सशस्त्र दलातील व्यक्तींच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यतनट्टी , सचिन आर. शिवण्णावर, . उपाध्यक्ष सुधीर चव्हाण गिरीश एन. पाटील, बंटी कापही, व्यवस्थापकीय समिती सदस्य महांतेश टी. पाटील, अभिषेक उ. उदोशी, आदर्श ए. पाटील, इरफान वाय. बायल, प्रभाकर के. पवार आणि महिला प्रतिनिधी . पूजा बी. पाटील आणि बारचे इतर सदस्य उपस्थित होते आणियावेळी त्यांनीही शोक व्यक्त केला आहे.