13 जणांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा किरकोळ अपघात
ताफ्यातील एका रुग्णवाहिकेचे संतुलन बिघडल्याने ती अनियंत्रित होऊन लहानशा टेकडीला जाऊन धडकली. 13 जणांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या या रुग्णवाहिकेचा किरकोळ अपघात गुरुवारी सकाळी घडला. या पार्थिवांना वेलिंगटन मधून मद्रास रेजिमेंटल सेंटर कडे नेण्यात येत असताना हा किरकोळ अपघात झाला. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर अकरा अधिकाऱ्यांचा काल एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असतानाच पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा किरकोळ अपघात झाला. अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी एका पाठोपाठ एक होत असलेल्या घटनेने संशय व्यक्त होत आहे.