सध्या कर्नाटक सरकार अंगणवाडी आणि सरकारी शाळांमधील मुलांना अंडी देत आहे. त्यामुळे सर्व अंगणवाड्यांमध्ये आणि शाळांमध्ये मुलांना अंडी देण्याऐवजी केळी सफरचंद ,मोसंबी, संत्री यासारखी फळे द्यावीत. अशी मागणी
शाकाहारी नागरी संस्था जैन लिंगायत आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्याकडे करण्यात आली.
1991 आणि 2006 मध्ये अंगणवाडी मुलांना अंडी देण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी सर्व सहकारी नागरी संस्थांच्या वतीने याचा विरोध केला. मात्र आता पुन्हा अंगणवाडी आणि शाळेत मुलांना अंडी देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे त्यामुळे या सर्व मुलांना अंडी देण्याची कपडे किंवा पोषणयुक्त आहार देण्यात यावा.
कर्नाटकात जवळपास 79 टक्के मुले शाहाकारी आहेत. आणि उर्वरित 21 टक्के मांसाहारी आहेत. त्यामुळे हे मांसाहारी मुले आहेत त्यांना फक्त अंडी देण्यात यावी आणि शाकाहारी मुलांना अंडी देण्याऐवजी फळे अथवा प्रोटीन युक्त पदार्थ द्यावा अशी मागणी करण्यात आली.
ज्या प्रकारे अंड्यामध्ये पोषक घटक आहेत त्याचप्रमाणे शहाकारी पदार्थांमध्ये देखील आहे. शेंगदाणे कडधान्य याशिवाय अनेक पदार्थांमध्ये प्रोटीन फायब्रॉइड्स जीवनसत्व विटामिन अ ब क ड आहेत. अशा प्रकारचे पदार्थ मुलांना देण्यात यावे अशी मागणी सर्व शाकाहारी नागरी संस्था जैन ब्राम्हण आम्ही लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना केली. तसेच या मागणीचे निवेदन सादर केले.