खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील कणकुंबी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या चिगुळे गावातील महिलांना मनरेगा कायद्याची माहिती ‘श्रमिक अभिवृद्धी संस्थेमार्फत’ दिली., व रोजगाराच्या कामाबद्दल चर्चा केली. यावेळी राहुल पाटील यांनी महिलांना एकत्र येऊन गटामार्फत कसे काम मिळवावे., महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानीक ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात 100 दिवस रोजगार मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले. चिगुळे गावातील जवळपास 50/60 महिलांशी चर्चा करताना राहुल पाटील यांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच 2019 ला अतिवृष्टीमुळे नुकसान झाले., त्यानंतर जवळपास दिड वर्ष कोरोना महामारीने सर्वांचीच आर्थिक घडी मोडकळीस आणली., व यावर्षी परत एकदा अवेळी पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाया घालवल्याने जगणे कठीण झाले आहे असे महिलांनी कळकळीने सांगितले. आपल्या गा्कऱ्यांकडे असणारी शेती तुटपुंजी आहे. शेतात म्हणावे तसे उत्पन्न निघत नाही. त्यातून बेभरवशाच्या निसर्गामुळे थोडेसेच पीक मिळते. थोडीफार सुकलेली लाकडे गोळा करून स्वयंपाकासाठी चुल पेटवावी लागले. चिगुळे गावापासून तालुक्याचे – खानापूर (42km) व जिल्ह्याचे – बेळगावी (50km) दोन्ही ठिकाणं दूर असल्याने रोजगाराची साधनें उपलब्ध नाहीत. एसटी बसेसची म्हणावी तशी सोय नाही. स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने उपासमार होते., पर्यायाने उर्वरित दिवस कामासाठी परराज्यावर (गोवा) अवलंबून रहावे लागते. अशा विविध समस्या महिलावर्गानी मांडल्या. बेळगांवहुन आलेल्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल देसाई, ज्ञानेश्वर पाटील व हर्षल पाटील यांनी रोजगाराचे फाॅर्म भरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी चिगुळे गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.