भारतीय लष्कर अधिकारी बिपीन रावत अनंतनात विलीन
हेलिकॉप्टरचा दुर्दैवी अपघात होऊन हेलिकॉप्टर मधील 13 जणांचा मृत्यू झाला आहे .यामध्ये भारतीय लष्कराचे अधिकारी बिपिन रावत यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तामिळनाडूतील कुन्नूर भागात हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे . ही भारतासाठी एक दुःखद बाब असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.कर्नाटक – तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला .महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली होती .तर आता त्याच्या मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे .
भारतीय लष्कराचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली .या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते तर त्यातील 13 जण मृत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.