अन त्या व्यक्तीला हलविले शासकीय निवारा केंद्रात
बेळगांव: येथील काँग्रेस रोडवरील पॉप इन समोर एक अनोळखी व्यक्ती रात्री साडेनऊच्या सुमारास मिलिटरी महादेव च्या समोरील असलेल्या फुटपाथवर रेल्वे रुळानजीक झोपल्याचे काहींच्या निदर्शनास आले.
सदर व्यक्ती एका चांगल्या कुटुंबातील असल्याचे समजताच या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून रेल्वे रुळाला शेजारी झोपलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी शंकर पाटील यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी शंकर पाटील आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी दाखल होत त्या व्यक्तीस खासबाग येथील शासकीय निवारा येथे हळविले.