अश्वत्थामा मंदिरात चोरी
बेळगाव: सध्या चोरट्यांनी मंदिरांना लक्ष केले आहे. गांधीनगर येथील जैन मंदिरात चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी येथील पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आली आहे त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
येथील अश्वत्थामा मूर्तीचा चांदीचा किरीट लंपास करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत चार लाख रुपये इतकी आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञातांनी मंदिरात प्रवेश करून चांदीचा किरीट चोरी केला. तसेच चोरट्यांनी आणखीन एका एका मंदिरात चोरी करून या देवीचे कपडे येथील एका कॉम्प्लेक्स मध्ये टाकले असे येथील नागरिकांनी सांगितले.