नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला
बेळगाव : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तारेला स्पर्श होऊन एका जर्मन शेफर्ड कुत्र्याचा मृत्यू झाला. अशाच प्रकाराची एक तार विद्युत खांबातून बाहेर पडल्याची कॅम्प परिसरत काहींच्या निदर्शनास आले.ज्या प्रकारे जर्मन शेफर्ड कुत्र्याचा मृत्यू झाला.अशाच प्रकारे मुक्या प्राण्यांचा हकनाक बळी जाऊ नये. यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने कॅम्प परिसरातील या घटनेची माहिती कॅम्प पोलीस स्टेशनच्या विनोद महाल मनी यांना देण्यात आली.
यावेळी त्यांनी लागलीच या घटनेची माहिती केईबी अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे त्यांनी ताबडतोड घटनास्थळी दाखल होऊन येथील खांब्याची पाहणी केली आणि तारे ची दुरुस्ती केली. सदर धोका वेळीच लक्षात आल्यामुळे तसेच नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टाळला .
