ॲडव्होकेट डे निमित्त बार असोसिएशन मध्ये कार्यक्रम
बार असोसिएशनच्या वतीने आज 3 डिसेंबर रोजी ॲडव्होकेट डे साजरा करण्यात आला .यावेळी या विशेष दिनाच्या निमित्ताने बार असोसिएशन मधील ज्येष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला .सदर कार्यक्रम दुपारी दोन वाजता येथील न्यायालय आवारातील ओल्ड बार असोसिएशन टिव्ही हॉल मध्ये पार पडला
यावेळी बेळगाव बार असोसिएशनने बेळगाव बार असोसिएशनच्या पाच ज्येष्ठ वकिलांचा सत्कार केला गेला . जेष्ठ वकील टी.एन. सानिकोप, ए.के. कोटरशेट्टी किसन यळ्ळूरकर जे.एस. मंद्रोली, राम आपटे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी अध्यक्षस्थानी बेळगाव बार असोसिएशनचे प्रभू यत्नत्ती होते. तसेच या कार्यक्रमाला सचिन आर. शिवण्णावर, सुधीर बी. चव्हाण, गिरीश एन. पाटील, बंटी कापही,महांतेश टी. पाटील, अभिषेक उ. उदोशी, आदर्श ए. पाटील, इरफान वाय. बायल, प्रभाकर के. पवार पूजा बी.पाटील उपस्थित होते .