चिदंबर नगरात पोलिसांची जनजागृती
बेळगाव :चिदंबर नगर भागात येथील उद्यमबाग पोलिस प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या 112 या नंबर विषयी जनजागृती मोहीम राबविली. यावेळी पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्याबरोबरच या भागात कोणताही गैरप्रकार दृष्टीस पडल्यास 112 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
सदर जनजागृतीचा उपक्रम पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चिदंबर नगर भागात राबविला . यावेळी उद्यमबाग पोलिस स्थानकाचे एस आय आय एस जी पेडणेकर,एरणा चावलागी, शिवकुमार कार्की, अक्षय नाईक यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.