संथ गतीने सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करा
बेळगाव गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याची वाताहत झाल्याने अनेक व्यवसायांना फटका बसत आहे. बेळगाव वरून गोव्याला जोडणाऱ्या अनमोड मार्ग आणि चोर्ला मार्गचे काम संथ गतीने होत असल्याने या मार्गावरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळेही रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावे आणि दुरावस्थेत झालेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे अशा मागणीचे निवेदन चेंबर ऑफ कॉमर्स,कापड व्यापारी संघटना आणि विविध संघटनांनी डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी यांना दिले आहे.
या निवेदनात त्यांनी बेळगाव ते गोवा जोडणाऱ्या रस्त्याचा विकास अर्धवट कशाप्रकारे राहिला आहे याचा संपूर्ण तपशील दिला आहे. तसेच खानापूर ओव्हरब्रीज चे काम संथ गतीने सुरू असल्याचेही यामध्ये नमूद केले असून खानापूर,देसुर,पिरनवाडी चा रस्ता 90 टक्के पूर्ण झाला आहे.
मात्र दहा टक्के अद्यापही बाकी असल्याने या मार्गावरून जाताना अनेक समस्या उद्भवत आहेत. तसेच चोर्ला मार्गाची अवस्था दयनीय झाल्याने त्यामार्गावर जाताना वाहनधारकांना अडचणीचे ठरत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आली आहे.