बेळगांव :शहापूर येथील सरकारी सरस्वती महाविद्यालय आणि बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या वतीने प्री युनिव्हर्सिटी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या कराटे स्पर्धेत बेळगावच्या विविध महाविद्यालयांच्या 100 हून अधिक विद्यार्थी सहभागी घेतला होता. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डीडीपीयु नागराज व्ही,प्राचार्य बी वाय होन्नूर,प्रभू शिवनाईकर, जी एन पाटील,जितेंद्र काकतीकर,अमित जाडे, रमेश अलगुडकर ,गजेंद्र काकतीकर ,विठ्ठल बोजगर ,निलेश गुरखा, परशराम काकती, हरीश सोनार, नताशा अष्टेकर ,विनोद दांडकर ,अक्षय परमोजी उपस्थित होते.