सध्या तरी लॉक डाऊन नाही,मात्र नियम पाळा
दक्षिण आफ्रिके नंतर काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएन्टचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी या व्हेरीएन्टचे रुग्ण आढळलेल्या देशांमधील विमानांचा उड्डाण्णावर निर्बंध घातले आहेत. दरम्यान राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये असे यासाठी जिल्हा प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएन्टने प्रवेश केलेला नाही. मात्र काही जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढत असल्याने खबरदारी घेतली जात आहे.केरळ राज्यातून येणाऱ्यांमध्ये राज्यात कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे केरळला लागून असलेल्या राज्यातील मंगळूर कोडगु चामराजनगर म्हैसूर या जिल्ह्यांमध्ये सतर्कता बाळगण्यात आले असून केरळमधून येणाऱ्यांची rt-pcr चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे.
त्यामुळे या नवीन विषाणू संदर्भात नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये. मात्र सर्वांनी खबरदारी आवश्यक घेणे असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्य सरकारला या संबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा लॉक डाऊन होणार का असा प्रश्न राज्यातील नागरिक विचारू लागले आहेत. तसेच राज्यात या लॉकडाउनच्या चर्चेला उधाण आले आहे
या नव्या विषाणूचे दोन रुग्ण बेंगलोर विमानतळावर आल्यामुळे कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बॉम्माई यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून कोरोनाविषाणू संदर्भात सविस्तर चर्चा करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सध्या राज्यात लॉक डाऊन करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र नागरिकांनी स्वतःची सुरक्षा बाळगून नियमांचे पालन करावे असे त्यांनी सांगितले आहे.