मोदगे येथे वीर जवानाला श्रद्धांजली मोदगे तालुका हुकेरी येथे शहीद वीर जवान महादेव कल्लाप्पा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली दिनांक 27 नोव्हेंबर 2001 रोजी जम्मू-काश्मीरमधील पूंछ राजौरी या ठिकाणी अतिशय दुर्गम भागात अतिरेक्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात मराठा लाईट इन्फंट्री चा 27 राष्ट्रीय रायफल च्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली व त्यात महादेव पाटील यांना वीरमरण आले त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावातील आजी माजी सैनिक संघटनेचे कार्यकर्ते तसेच सलामवाडी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष शरद पाटील व गावातील पंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी त्यांच्या स्मारकाजवळ जमा झाले होते त्यांच्या स्मारकाला आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यांना दोन मिनिटे स्तब्धता राहून आदरांजली वाहण्यात आली यावेळी राष्ट्रगीत गाऊन व देशप्रेमाने भारावून जाणाऱ्या घोषणा देण्यात आल्या यावेळी वीर पत्नी वैशाली महादेव पाटील व वीर माता अनुबाई पाटील व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते