शहीद जवानाचा 35 वा स्मृतिदिन साजरा
बेळगाव : 1987 मध्ये वीरमरण आलेल्या कंग्राळी बुद्रुक गावच्या सुपुत्राचा आज स्मृतिदिन साजरा करण्यात आला. भारतीय सैन्यदलात कामगिरी बजावताना कंग्राळी बुद्रुक गावचे सुपुत्र निंगाप्पा चिखलकर यांना 29 नोव्हेंबर 1987 रोजी वीर मरण प्राप्त झाले .त्यामुळे बलिदान दिलेल्या कंग्राळी बुद्रुक गावच्या सुपुत्राचा 35 स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मारकाचे पूजन करण्यात आले. तसेच शहीद निंगाप्पा चिखलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष अनिल पावशे,सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, बाबू दोडमनी,नवनाथ पुजारी, तानाजी पाटील सोसायटीचे संचालक भाऊराव कडोलकर व त्यांचे बंधू सुभाष चिखलकर ,शंकर चिखलकर ,माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील ,प्रशांत पवार ,शंकर कोनेरी, सदानंद चव्हाण यांच्यासह कंग्राळी बुद्रुक गावचे नागरिक उपस्थित होते.