मित्रानेच केला मित्राचा खून
बेळगाव :धारवाड रोड जुने बेळगाव येथील एका वाईन शॉप मध्ये रविवारी रात्री दारू पिण्यासाठी आलेल्या दोन मित्रांमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान एका तरुणाचा खून करण्यात झाले.रविवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली सुरज नंदकुमार गौडाडकर वय 23 राहणार जुने बेळगाव असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की जुने बेळगाव नाका वरील एका वाईन शॉप मध्ये रविवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला वादावादीनंतर एकमेकांना धक्काबुक्की व ढकलून देण्याचा प्रकार घडला याच वेळी खाली पडलेल्या सुरजच्या डोक्याला दुखापत झाली त्याला तातडीने एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले डॉक्टर आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहापूर पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.सध्या सुरजचा खून करणाऱ्या त्याच्या मित्राचा शोध घेण्यात येत आहे.