अधिकार्यांनो अनर्थ घडण्याआधीच लक्ष द्याल का?
बेळगाव: गेल्या दोन दिवसापूर्वी एक जर्मन शेफर्ड कुत्र्याचा रस्त्यावरील दिव्यांच्या थेट वायरची संपर्क आल्याने जागीच मृत्यू झाला. अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप पाळीव प्राण्याचा हकनाक बळी गेला.
असाच बळी पुन्हा जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथील ओल्ड पी रोड वरील अबकारी खात्याजवळील पट्टेड हॉस्पिटल समोर असलेल्या फुटपाथवरील पथदिव्यांची तार खांब्याच्या बाजूला आली आहे. त्यामुळे पादचारांना आणि मुक्या जनावरांना याचा धोका अधिक आहे.
येथील भागात अनेक हॉस्पिटल्स असल्याने रुग्णांची आणि त्याच्या नातेवाईकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आधी येथील खांब्यातून आलेली उघडी तारेचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.