भरतेश कॉलेज मध्ये फ्रेशर्स डे आयोजन
बेळगाव : भरतेश पीयू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि जेजीएनडी भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्स यांनी. शनिवारी 27 नोव्हेंबर 2021 रोजी रूपाली कन्व्हेन्शन हॉल येथे PUC, B.Com, B.Sc आणि BA वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जिमखान्याचे आरंभ उद्घाटन आणि फ्रेशर्स डे आयोजन केले. होते .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यूरोलॉजिस्ट डॉ.कमलाकर आचरेकर,
सामाजिक कार्यकर्त्या मोनिका सावंत उपस्थित होत्या ..
यावेळी प्राचार्या सुनीता देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या वाढीची माहिती दिली आणि शैक्षणिक वर्ष 2021-21 पासून बी.ए.चा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली. प्रा. माधवी पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.कमलाकर आचरेकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच यशाचा कान मंत्र दिला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कसा विकसित केला पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर त्यांनी प्रकाश टाकला. भविष्याची कल्पना करणे हा यशापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे हे देखील त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी मोनिका सावंत यांनी विद्यार्थ्यांना उत्साही केले .तसेच राजीव दोड्डन्नावर यांनी अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी प्रेरित केले आणि चांगले समाज घडविण्यासाठी त्यांनी सामाजिक जबाबदारी निभावून सर्वोत्कृष्ट योगदान दिले पाहिजे असे सांगितले.
2021-22 या वर्षासाठी मिस.अन्विता शेट्टी, PUC मधील श्री. ऋषभ मरगाळे आणि पदवीमधून मिस स्वाती पाटील आणि यशराज तोडकर मिस फ्रेशर आणि मिस्टर फ्रेशर ठरले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .याप्रसंगी भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नावर हे अध्यक्षस्थानी होते. श्री हिराचंद कलमानी, अध्यक्ष, भरतेश कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बेळगावच्या गव्हर्निंग कौन्सिल आणि इतर सर्व जीसी सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते